संघर्षनामा न्यूज lश्रीगोंदा
दि .१८जुलै२०२४
लिपणगाव प्रतिनिधी,
कोळगाव येथील साहिल नलगे याची महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघाच्या अंडर १९ मध्ये अंतिम २० जणांच्या निवडीमधून १६ जणांमध्ये निवड झाली होती. आपल्या अष्टपैलू खेळाने निवड समितीचे लक्ष वेधून घेतलेल्या साहिलने नुकत्याच पार पडलेल्या चेन्नई येथील क्रिकेट सामन्यांमध्ये उत्कृष्ट खेळ केल्याबद्दल मानधन स्वरूपात मिळालेली ५१ हजार रुपये रक्कम श्री कोळाईदेवी मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी देणगी म्हणून अर्पण केली. त्याच्या या कृतीने युवकांमध्ये आदर्श निर्माण करून दिला आहे.
कुकडी कारखान्याचे संचालक मच्छिंद्र नलगे यांचे चिरंजीव साहिल नलगे याने चेन्नई येथे झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या संघामधून अष्टपैलूची कामगिरी पार पाडली. त्यामुळे साहिल यास भरघोस मानधन प्राप्त झाले होते. परंतु खेळाबरोबरच आपण समाजाचे दायित्व लागतो व ज्या मातीतून आपण महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केले त्या मातीला काहीतरी देणे लागतो या भावनेतून त्याला मिळालेली मानधनाची रक्कम कोळगावचे ग्रामदैवत श्री कोळाईदेवी मंदिराच्या जीर्णोधारासाठी देणगी म्हणून दिली. त्याच्या या कृतीचे समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
यावेळी सोसायटीचे चेअरमन हेमंत नलगे, लोकनियुक्त सरपंच पुरुषोत्तम लगड, कुकडी कारखान्याचे संचालक मच्छिंद्र नलगे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नितीन डुबल, उपसरपंच संतोष मेहत्रे, ग्रामपंचायत सदस्य चिमणराव बाराहाते, असीर शेख , सुरेश थोरात, नितीन लगड, आबासाहेब गाडेकर, भाऊसाहेब जगताप गुरु, विजय नलगे, अनिल नलगे, दादासाहेब लगड, तसेच क्रिकेट प्रेमी खेळाडू व नागरिक तसेच भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.