संघर्षनामा न्यूज l श्रीगोंदे
दि.२१जून २०२४
प्रतिनिधी,
आधुनिक फकीरा सोमनाथ भाऊ कांबळे यांच्या जयंतीनिमित्त मौजे भातंब्री या गावी आधुनिक लहुजी सेना धाराशिव जिल्हा मिडिया अध्यक्ष विजय भाऊ कांबळे यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भातंब्री येथे सोमनाथ भाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करुन,
शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे व खाऊचे वाटप करण्यात आले.
सामाजिक तळमळ आणि युवांची सळसळ असणारं व्यक्तिमत्व,चळवळीतला ढाण्या वाघ सोमनाथ भाऊंची अन्यायाच्या विरोधात दहाड काय होती. संघटन कौशल्य कसं होतं याचा वैचारीक वारसा चालवण्याची गरज असुन ती प्रेरणा समाजात रुजवण्याची गरज असल्याचे विजय भाऊ कांबळे यांनी सांगितले
त्यावेळी उपस्थीत आधुनिक लहुजी सेना धाराशिव ग्रामीण जिल्हाध्यक्ष जयराज भाऊ क्षीरसागर, मिडिया अध्यक्ष विजय कांबळे, जयराम कांबळे,दादा कांबळे, लक्ष्मण पारदे,बाळु जाधव, शिक्षक वर्ग महीला भगिनी व बांधव उपस्थित होते.