श्री व्यंकनाथ विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साही वातावरणात साजरा

संघर्षनामा न्यूज l श्रीगोंदे

दि.२१जून २०२४


      लिंपणगाव (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील माध्यमिक; उच्च माध्यमिक; प्राथमिक यासह अन्य शिक्षण संस्थांच्या शाळांमध्ये शुक्रवारी 21 जून रोजी सकाळी ७.३० वाजता आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील श्री व्यंकनाथ विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनाचे उत्साही वातावरणात आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ज्येष्ठ योगाचार्य भाऊसाहेब वाघ सर यांनी योग दिनाचे महत्त्व पटवून देत स्वतः विद्यार्थ्यांसमवेत प्रात्यक्षिक करत विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. प्रारंभी प्रथम प्रार्थने दरम्यान योगाचार्य यांनी योग दिन प्रार्थना द्वारे आम्ही ध्येयाच्या दिशेने एकत्र जाऊ; आम्ही एक विचाराने राहू; एकच विचार बोलू; आमचे मन एक असो; पूर्वी देवांनी सुद्धा एकत्र येऊन मोठे यश मिळविले; तसे आम्हीही एकत्रित प्रयत्नाने यश मिळवू असे म्हणत योग दिनाची विद्यार्थ्यांना सांगड घालून दिली. यावेळी ध्यानाच्या स्थितीत बसून योगाचार्यांनी प्रथम नमस्कार मुद्रा करून प्रार्थना गायली. 


          यावेळी योगाचार्य व सेवानिवृत्त शिक्षक श्री भाऊसाहेब वाघ सर यांनी योगाचे विविध प्रकार विद्यार्थ्यांसमोर साजरे केले. प्रथम पूरक हालचाली; मानेची उजवीकडे व डावीकडे हालचाल; खांद्याची हालचाल; कमरेच्या हालचाली; पायाच्या हालचाली; बैठक स्थितीतील असणे; योगासने; कपालभाती; प्राणायाम; ध्याना स्थिती; संकल्प शांतीपाठ वृक्षासन पाद हस्तासन अर्ध चक्रासन त्रिकोणासन भद्रासन अर्ध वृष्टासन; वरजासण अर्धवृष्टासन शशांकासन आदी योगासने साजरी करून विद्यार्थ्यांना उत्तम प्रकारे योगाचार्य श्री वाघ प्रात्यक्षिके करत मार्गदर्शन केले. प्रसंगी जेष्ठ योगाचार्य अर्जुनराव कुलांगे हेही उपस्थित होते.


              शेवटी सर्वांनी सुखी व्हावे; सर्वांनी निरोगी व्हावे; सर्वांनी निरायम व्हावे; सर्वांचे कल्याण व्हावे;. ओम: शांती; शांती; शांती म्हणत या योग दिनाची योगाचार्य श्री भाऊसाहेब वाघ यांनी सांगता केली या प्रात्यक्षिकांचा सर्वच विद्यार्थ्यांनी मनसोक्तपणे आनंद घेतला. याप्रसंगी प्रात्यक्षिकामध्ये विद्यार्थी व शिक्षकांनी मोठा सहभाग घेतला. प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री संजय दळवी यांनी केले. सूत्रसंचालन ज्ञानदेव धायगुडे यांनी तर आभार ज्येष्ठ शिक्षक अविनाश कांबळे यांनी मानले.


     दरम्यान या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा तालुक्यातील श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था; ज्ञानदीप ग्रामीण विकास शिक्षण संस्था यासह तालुक्यातील सर्व शिक्षण संस्थांच्या शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन सर्वत्र उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.

Related Post