न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयात नवगतांचे स्वागत.

संघर्षनामा न्यूज l श्रीगोंदे

दि.१६जून,२०२४

 लिंपणगाव ( प्रतिनिधी) मढेवडगाव तालुका श्रीगोंदा येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात शाळेच्या पहिल्याच दिवशी नवग्रतांचे स्वागत व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ संपन्न झाला.सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते

कर्मवीर अण्णा व सौ वहिनी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून  कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.           

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष थोर देणगीदार  रविंद्रजी महाडिक साहेब . तसेच विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले . मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वितरित करण्यात आली.           


    तदनंतर एन एम एम एस .व स्कॉलरशिप, परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या.  विशाल गोडसे.   उवेज तांबोळी.    गजानन ठोकळे. तसेच    एसएससी परीक्षेत प्रथम आलेल्या कुमारी आर्या जगताप.   सुयश उंडे व ऋतुजा मांडे या तीन विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.    विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री हौसराव दांगडे  साहेब  यांनी प्रास्ताविकेत  विद्यालयात  प्रभावीपणे राबविल्या जाणाऱ्या  विविध उपक्रमांची माहिती दिली.

याप्रसंगी श्री नवनाथ उंडे;  सौ देवयानी ताई शिंदे व उपसरपंच राहुल साळवे यांनी आपले ग्रामस्थ मनोगत व्यक्त केले.        


     कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून आवर्जून उपस्थित असलेले श्रीगोंदा तालुक्याचे माजी आमदार कुकडी सहकार साखर कारखान्याचे चेअरमन व मॅनेजिंग कौन्सिल सदस्य आदरणीय श्री राहुलदादा जगताप आपल्या प्रमुख अतिथी मनोगतत बोलताना म्हणाले की पंचक्रोशातील सर्व ग्रामस्थ कोणत्याही प्रकारचे हेवेदावे मनात न ठेवता शालेय विकासात भरपूर योगदान देतात.शाळेचा गुणवत्ता पूर्ण विकास होण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतात. या कार्यक्रमाप्रसंगी

मा.उपसरपंच गणेश मांडे यांनी विद्यालयस फुलझाडे भेट दिली 

याप्रसंगी उपस्थित असलेले मान्यवर  मढेवडगावचे लोकनियुक्त सरपंच प्रमोद शिंदे, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य विजयराव उंडे, वि.से. कार्यकारी सोसायटी चे चेअरमन प्रकाशराव उंडे, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य  योगेश शिंदे, बाबासाहेब फाफाळे  ,अभय गुंड, तसेच तंटामुक्ती अध्यक्ष सचिन उंडे , मा. उपसरपंच अमोल गाढवे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान दिघे अर्चना कोरडे प्रणव नलगे यांनी केले तर आभार विद्यालयाचे पर्यवेक्षक विलासभाऊ सुलाखे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व सेवकांनी परिश्रम घेतले.*

Related Post