आ.प्रा.राम शिंदे यांचा अपघातग्रस्त कुटुंबाला मदतीचा हात .!

संघर्षनामा न्यूज l कर्जत

दि.१६ जून २०२४

प्रतिनिधि, उज्वला उल्हारे 

काल दि .१५/०६/२०२४ रोजी जामखेडहून कर्जतकडे येताना एक अपघातग्रस्त कुटुंब रस्त्याच्या कडेला मदतीची वाट पाहत वेदनेने विव्हळत होते . मोटार सायकलचा ताबा सुटून अपघात झाला होता . पति, पत्नी आणि छोटे बाळ असे कुटुंब त्या मोटार सायकल अपघातात सापडले होते . बाळ सुखरूप होते परंतु महिलेला मुका मार लागलेला असल्याने तिला उठता येत नव्हते .कर्जतला सिंदखेड राजा या आईसाहेब जिजाऊ च्या माहेरातून रायगडाकडे जाणाऱ्या जिजाऊ रथाचे आगमन होणार होते . त्याच्या स्वागतासाठी आणि जिजाऊ माँ साहेब यांच्या प्रतिमेला अभिवादन करणे साठी आणि एका पक्षीय बैठकीसाठी आ .राम शिंदे येत असताना त्यांनी त्या अपघातग्रस्त कुटुंबाला मदतीचा हात देत स्वतःच्या गाडीत घेऊन वैद्यकीय मदत केली आणि उपचाराचा खर्चही उचलला . अपघातग्रस्त कुटुंब हे करमाळा तालुक्यातील पारेवाडी या गावचे होते . अपघातग्रस्त महिलेचे नाव माधवी काळे असे होते .

त्यानंतर जिजाऊ रथाचे स्वागत करून आऊसाहेब जिजाऊच्या प्रतिमेचे त्यांनी दर्शन घेतले आणि समवेत असलेले आईसाहेब जिजाउंच्या वंशजांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान केला .

 समवेत असलेले भाजपा तालुकाध्यक्ष यांनी असे म्हटले कि आईसाहेब जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करताना त्याच वेळी मेघराजाही समरसून बरसत होता जणू त्यानेही माणसातले माणूसपण जपणार्या, माणुसकीचे आणि सहृदयतेचे दर्शन घडविणारे आ .राम शिंदे यांना सहस्त्र धारांच्या बाहूंनी आशिर्वादच दिले .

Related Post