नवनागापूर मध्ये आजी-माजी सैनिकांच्या एकतेची वज्रमूठ..

संघर्षनामा न्यूज l नगर

दि.१३जून २०२४

प्रतिनिधि,

 नवनागापूर चेतना कॉलनी एमआयडीसी अहमदनगर येथे सर्व आजी-माजी सैनिक /अर्धसैनिक  ,वीरमाता, वीरपिता ,वीर पत्नी यांचे समवेत आजी माजी सैनिकांची बैठक श्री विठ्ठल रुक्माई मंदिर चेतना कॉलनी येथे उत्साहात संपन्न झाली.

    नवनागापूर हे प्रस्थापित गाव नसून विस्थापित केलेले गाव आहे. यामध्ये जिल्ह्यामधून अनेक आजी माजी सैनिक एमआयडीसीमध्ये उपजीविकेसाठी व सुख सोयीनुसार वसलेले आहेत. या गावात सरासरी २१५ आजी माजी सैनिक अर्धसैनिक वीरमाता कायमस्वरूपी वास्तव्यात असून ,लोकसंख्येने मोठे गाव असल्याने येथे राहणाऱ्या सैनिकांना एकत्रितपणे एका विचार मंचावर बोलावून त्यांच्या मूलभूत समस्यांच्या समाधानासाठी वज्रमुठ बांधण्याचे मनसा मेजर निळकंठ उल्हारे व सर्व सैनिक बांधवांची होती.त्यासआजी माजी सैनिक परीवारांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने पहिल्यांदाच बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 

    उपस्थित प्रत्येक सैनिकाने एकत्रित येण्याचे फायदे सर्वांसमोर मांडले व त्यास सर्वांचे अनुमोदन मिळाले. ज्या सैनिकांच्या वैयक्तिक समस्या आहेत त्या सर्वांनी मिळून सोडवण्याचा पक्का निर्धार कृती समितीच्या माध्यमातुन करण्यात आला. 

सर्व सैनिका मधून भविष्य काळासाठी सक्रिय वेळ देणाऱ्या ११ संचालकांची निवड पुढील मीटिंगमध्ये रविवारी दि. ३०/०६/२०२४ रोजी सकाळी नऊ वाजता श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, चेतना कॉलनी ,नवनागापूर ,नगर मनमाड हायवे लगत अहमदनगर येथे करण्याचे ठरवले आहे.

 तरी या माध्यमातून सर्व सैनिकांन पुढील मिटींगला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. मागील बैठकीमध्ये संघटना स्थापनेवर विचारपूर्वक चर्चा झाली त्यासाठी लागणारे कागदपत्र व निधीची व्यवस्था करण्याचे एकमतानं ठरले आहे. घरपट्टी माफी बद्दल चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्याचा निर्धार केला अशा अनेक समस्या वरती एकत्रित कार्य करण्याचे ठरवले आहे.

      या बैठकीसाठी विशेष परिश्रम मेजर लहू सुलाखे  व मेजर बाबासाहेब तेलोरे यांनी केले. 

बैठकीचे सूत्रसंचालन मेजर नीलकंठ उल्हारे यांनी केले.

यावेळी रावसाहेब गोरे ,अनिल सत्रे,बाबासाहेब डाके, राजू गीते, ओम प्रकाश शिंदे, नामदेव शिंदे,किसन कांबळे, रामदास ठोकळ, संतोष कासार, सुरज बिडकर ,अनिल गुजर, गहीनाथ दहिफळे, नंदकुमार घुगे, संतोष गायकवाड, दांगट मेजर, कमरुद्दिन आत्तार, बाजीराव भालेराव, राजेंद्र गोरे, रवींद्र इंगळे, राहुल पाटोळे, सागर भोंदे आदी माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अल्पोपहारानंतर अनिल सत्रे व दांगट  मेजर यांनी उपस्थित सैनिक व मंदिर समितीचे आभार व्यक्त केले.

Related Post