कुकडीच्या पाण्यासाठी एकदिवसीय धरणे आंदोलन...

संघर्षनामा न्युज l श्रीगोंदे

दि.२८मे २०२४

लिंपणगाव, प्रतिनीधी 


श्रीगोंदा तालुक्यात काँग्रेस पक्षाच्या घनश्याम शेलार व सर्व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते यांच्यावतीने श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. कुकडी ,घोड, विसापूर, सीना हक्काचे पाणी मिळवण्यासाठी, शेतकरी व विज ग्राहकांना वीज पुरवठा पूर्ण दाबाने सुरळीत व अखंडपणे मिळण्यासाठी, अवकाळी पाऊस व वादळामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई त्वरित मिळण्यासाठी हे धरणे आंदोलन श्रीगोंदा तालुक्यातील तहसील कार्यालय समोर करण्यात आले. शेतकरी वर्गावर अत्यंत बिकट प्रसंग ओढविलेला आहे एकीकडे कुकडीचे पाणी वेळेवर न मिळाल्याने शेती व्यवसायावर दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट, वादळाचा तडाका, तालुक्यातील शेतकऱ्यांचा वीजेचा प्रश्न ,यासारख्या नैसर्गिक आपत्ती कोसळत आहेत. यामुळे  तालुक्यातील सर्व शेतकरी हतबल झाले आहेत, त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यात काँग्रेस पक्षाच्या घनश्याम शेलार व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते यांच्यावतीने श्रीगोंदा तालुक्यातील तहसील कार्यालयासमोर सोमवार दिनांक २७ मे रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी घनश्याम शेलार बोलताना म्हणाले की ,श्रीगोंदा तालुक्याला कुकडीचे पाणी मिळाले पाहिजे वेळेवर पाणी न मिळाल्यामुळे तालुक्यातील  शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पिके व फळबागे पाण्याअभावी जळाले . आता येणारे पाणी  श्रीगोंद्यापासून सुरुवात झाली पाहिजे, अवकाळी मुळे जे वादळ झाले आहेत त्याची नुकसान भरपाई लवकरात लवकर शेतकऱ्यांना देण्यात यावी, तालुक्यातील वीज व्यवस्थापन सुरळीत करण्यात यावी, आम्ही जे निवेदन देत आहोत ते तातडीने वर कलेक्टर साहेबांना कळवा की पाणी जरी सोडले तरी श्रीगोंदा तालुक्यापासूनच  सुरुवात करण्यात यावी अशी मागणी घनश्याम शेलार यांनी केली. तीन दिवसानंतर माणिक डोह नंतर येडगाव मध्ये पाणी सोडण्यात येईल व तसेच  पाणी पुढे सोडण्यात येईल असे आश्वासन कुकडी इरिगेशनच्या अधिकाऱ्यांनी दिली.तहसीलदार क्षितिजा वाघमारे व नायब तहसीलदार , कुकडी इरिगेशनचे अधिकारी, महावितरण चे अधिकारी यांनी आंदोलन स्थळी येऊन भेट देऊन निवेदन स्वीकारले. यावेळेस स्मितल भैया वाबळे, प्रशांत दरेकर, मनोहर पोटे, उत्तम आबा नागवडे, मुकुणराव सोनटक्के, बाळासाहेब सोनवणे ,अरविंद कापसे ,विकास शेळके, बाबासाहेब इथापे, श्याम झरे, शरद कुदांडे ,नाना शिंदे, बाळासाहेब शेलार, संजय आनंदकर, प्रवीण शेलार आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले ‌. यावेळी मोठ्या संख्येने तालुक्यातील शेतकरी आंदोलनास उपस्थित होते.


                         :-चौकट -:

तहसीलदार आंदोलन स्थळी न येता प्रथम नायब तहसिलदार आले असता परंतु आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. श्रीगोंदा तालुक्याचे तहसीलदार निवेदन घेण्यासाठी टाळाटाळ करत होते परंतु आंदोलकांनी तीव्र घोषणाबाजी केली यावेळी तहसीलदार बाहेर या तहसीलदार बाहेर या अशा घोषणाबाजी  करण्यात आल्या. त्यानंतर तहसीलदारांनी आंदोलन स्थळी येऊन निवेदन स्वीकारले. मी हे सर्व काम  तातडीने करेल असे आश्वासन दिले‌. व हे सर्व कामे वरिष्ठांना तात्काळ कळविण्यात  येतील असे तहसीलदार क्षितिजा वाघमारे यांनी सांगितले.

Related Post